लोकप्रिय पोस्ट
-
कोरोना लसीला स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त कशासाठी ? ब्लॉगर / अशोक सुतार करोनावरील लस उंबरठय़ावर आली असल्यास , ते वृत्त निश्चितच दिलासादायक. मा...
-
मराठी भाषा संस्कृती : संवर्धनाची जबाबदारी सर्वांची अशोक सुतार / ८६००३१६७९८ महाराष्ट्रात रविवारी मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. मर...
-
नागरिकांच्या प्रश्नावर केंद्र सरकार किती संवेदनशील ? देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. भारताचा जीडीपी उणे २३.९ असा नोंदला गेला आहे. जाग...
-
भारत- चीन संघर्ष : अमेरिकेची भूमिका अशोक सुतार / ८६००३१६७९८ भारत आणि चीन या शेजारी असलेल्या देशांत सध्या सिमाप्रश्नावरून तणाव सुरु आह...
-
बंगालमधील राजकारण ब्लॉगर / अशोक सुतार हल्ली ज्या राज्यात भाजपचे सरकार नसेल तिथे राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्याची नवी कल्पना येत ...
-
बँकांच्या खासगीकरणाचे पाऊल अशोक सुतार / ८६००३१६७९८ केंद्र सरकारकडून लवकरच चार बँकांचे खासगीकरण करण्याची तयारी सुरु आहे. या...
-
ऑनलाईन शिक्षण दूरदर्शन व आकाशवाणीचा पर्याय दूरदर्शन व आकाशवाणी ही केंद्र सरकारची प्रसारमाध्यमे राजकीय कामासाठी केंद्रीय मंत्र्यांकडून...
-
पडद्यावरचा खलनायक ते लॉकडाऊन हिरो अशोक सुतार / ८६००३१६७९८ ब्लॉगर / अशोक सुतार पडद्यावरचा खलनायक ते लॉकडाऊन काळातील नायक सोनु सूदची ...
-
ढासळत्या अर्थव्यवस्थेवर सोन्याची मात्रा ? ब्लॉगर : अशोक सुतार / ८६००३१६७९८ ब्लॉगर / अशोक सुतार आज कोरोनाची गंभीर परिस्थिती ...
गुरुवार, ३१ मार्च, २०२२
हल्ले आणि षडयंत्र
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानासमोर भाजपच्या काही कार्यकर्त्यानीं निदर्शने करण्याचा प्रकार घडला. काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्यासाठी आलेले भाजपा नेते तेजस्वी सूर्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तेजस्वी सूर्या आणि तेजिंदर पाल सिंग बग्गा यांच्यासह भाजपा कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी तेथे पोहोचले होते. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.यावरून आम आदमी पक्षाने भाजपवर निशाणा साधला आहे. अमित शाह यांनी तोडफोडीचे आदेश दिले होते का?, असे आप नेत्या आतिशी यांनी म्हटले आहे. खासदार सूर्या पोलीस बसच्या छतावर चढले होते. आंदोलनादरम्यान केजरीवाल यांच्या घराच्या गेटलाही भगवा रंग देण्यात आला होता. याबाबत भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांनी म्हटले की, त्यांना केजरीवाल यांना काश्मिरी पंडितांसोबत कसा नरसंहार झाला याची आठवण करून द्यायची होती. त्यामुळे ते रस्त्यावर उतरले आहेत. केजरीवाल यांनी काही दिवसांपुर्वी म्हटले होते की, द कश्मिर फाईल्स हा चित्रपट यू ट्यूबवर प्रदर्शित करावा. तसेच या चित्रपटाचे उत्पन्न पिडित काश्मिरी पंडितांना द्यावे. यामुळे भाजपची मंडळी संतप्त झाली होती. केजरीवाल यांच्या निवासस्थानासमोरील निदर्शनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोडही केली. याबाबत आप नेते राघव चढ्ढा यांनी म्हटले की, पंजाबमधील पराभवानंतर भाजपाला धक्का बसला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानावर भाजपाच्या गुंडांनी केलेला हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे. पोलिसांच्या उपस्थितीत या गुंडांनी बॅरिकेड्स तोडले, सीसीटीव्ही कॅमेरे तोडले. पंजाबच्या पराभवाच्या रागात भाजपा अशा बेगडी राजकारणावर घसरला आहे. आरोप- प्रत्यारोप बाजुला ठेवून विचार केला तर असे दिसते की, केजरीवाल यांना पंजाबमध्ये मिळालेले प्रचंड बहुमत पाहून भाजपवाले हैराण झाले आहेत. तसेच केजरीवाल यांची द कश्मिर फाईल्सवरील टिपणी भाजपवाल्यांना पसंत नाही. असो. देशात सहिष्णूता राहिलेली नाही. सदर चित्रपटाचा विषय महागाईपेक्षा मोठा झाला आहे. केंद्रात भाजपची सत्त्ता असल्याने भाजपची मंडळी बेभान झाली आहेत, असेच दिसते.
केंद्रातील भाजपच्या नेत्यांमध्ये स्पर्धा सुरु आहे की, भाजप नेतृत्वाला कशाप्रकारे खुष करता येईल. भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या पोलीस बसच्या छतावर, तेही पोलिसांदेखत कसे चढले ? आंदोलनादरम्यान केजरीवाल यांच्या घराच्या गेटलाही भगवा रंग देण्यात आला होता. केजरीवाल यांना काश्मिरी पंडितांसोबत कसा नरसंहार झाला याची आठवण करून द्यायची होती, असे तेजस्वी सूर्या म्हटले आहे. या निदर्शनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोडही केली. पोलिसांनी भाजपवाल्यांना रोखले नाही, हे विशेष ! भाजपच्या खासदारांची ही गुंडगिरी कशासाठी ? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गोंधळ करून भाजपने काय साध्य केले ? पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेससोबतच भाजपाला देखील यश मिळवता आले नाही. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारत पंजाबमध्ये एकहाती सत्ता स्थापन केली. त्यामुळे भाजपा आणि आपमध्ये जोरदार सुंदोपसुंदी सुरू झाली असताना आता आपकडून अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर भाजपाकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी अरविंद केजरीवाल यांच्या हत्येच्या कटाचा गंभीर आरोप केला आहे. केजरीवाल यांना दहशत बसवावी, हा भाजपचा हेतू असल्याचे दिसत आहे. देशात जे विरोधक पुढे जात आहेत, त्यांच्यावर दहशतीचे प्रयोग केले जात आहेत. भाजपचे नेते आणि कार्यकर्ते या गोष्टीला आता सरावले आहेत. त्याना केंद्रीय यंत्रणेकडून पाठबळ दिले जात आहे. गैर भाजप शासित राज्यांमध्ये केंद्र सरकार कोणतीही मदत करीत नाही. त्यावरून केंद्र सरकार आणि अशा राज्यांतील राज्य सरकारचा खटका उडत आहे. साहजिकच स्थानिक भाजप नेत्यांना गैर भाजप शासित राज्यांतील सरकारविरोधात चेतवले जात आहे. हे षडयंत्र भाजपकडून देशात सुरू आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर झालेला प्रकार हा पूर्वनियोजित कटच होता, असा दावा मनीष सिसोदिया यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पोलिसांच्या उपस्थितीत भाजपाचे गुंड अरविंद केजरीवाल यांच्या घरी नेण्यात आले. त्यांच्या घरचे सीसीटीव्ही फोडले गेले. त्यांचे बूम बॅरिअर तोडण्यात आले. हे सगळे भाजपाच्या गुंडांनी पोलिसांच्या उपस्थितीत केले. हा पूर्वनियोजित कट रचून अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यात आला. मी भाजपाला म्हणतो की अरविंद केजरीवाल यांना हात लावण्याचा प्रयत्न करू नका. अशा प्रकारे हल्ला करून त्यांची हत्या करण्याचा कट देश सहन करणार नाही, असे देखील सिसोदिया यांनी म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली सात वर्षे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या कारकिर्दीत असे प्रकार वाढले आहेत, हे दु:खद आहे. महाराष्ट्रात स्थानिक भाजप नेते राज्य सरकारवर दररोज वाट्टेल ते आरोप करतात. काही नेते तर एवढे सरावले आहेत की, या आठवड्यात सरकार कोसळणार, त्या आठवड्यात सरकार कोसळणार असे वेड्यासारखे भविष्यवाणी करताना दिसत आहेत. महाराष्ट्रात इडीचे भय दाखवून राज्य सरकारला निष्प्रभ करण्याचे उद्योग सुरू आहेत. केजरीवाल यांच्या निवासस्थानी हल्ला करणारा भाजपचा खासदार तेजस्वी सूर्या आणि तेजिंदर पाल सिंग बग्गा यांच्यासह गोंधळी भाजपा कार्यकर्ते यांना कडक शिक्षा होणे गरजेचे आहे. अन्यथा अशी बिनडोक मंडळी झुंडीने काहीही करतील. केंद्र सरकारने दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या विरोधात यापुर्वी अनेक कारस्थाने केली आहेत. कारस्थाने करणे भाजपचे धोरण बनले आहे. गैर भाजपशासित पक्षांच्या राज्य सरकारांनी वेळीच शहाणे होऊन एकत्र येत अशा कारस्थानांचा पर्दाफाश करणे गरजेचे आहे.
मंगळवार, २९ मार्च, २०२२
महागाईचा वरवंटा
महागाईचा वरवंटा
कोरोना महामारीमुळे माणसाचे जीवन असह्य झाले होते. लोकांनी कसाबसा कोरोनाचा काळ व्यतीत केला. कोरोना काळाचा फायदा घेत व्यापार्यांनी जगणे महाग आणि मरण स्वस्त अशी अवस्था लोकांची केली होती. हे महागडे जीवन, वाढती बेरोजगारी, वाढती महागाई, लोकांनी कसे जगायचे, याचे उत्तर देशाचे अर्थमंत्री, पंतप्रधान देऊ शकत नाहीत. आयुष्य कसेबसे ढकलण्याचा आणि जगण्यातच सुख मानण्याचा प्रयत्न सामान्य माणूस करीत आहे. मात्र, केंद्र सरकारला याची पर्वाच नाही. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर सरकारने महागाईचा हाहाकार माजवला आहे. कश्मीर फाईल्स या चित्रपटाचे आणि त्या अनुषंगाने काही विशिष्ट विचारांचे उदात्तीकरण सुरु आहे. फिल्म पहा आणि सर्व दु:ख सहन करा, असेच सरकारला म्हणायचे आहे काय ? काही जणांनी तर महागाईचा जराही उच्चार न करता त्या चित्रपटाला करमुक्त करा, अशी सामाजिक मागणी करण्याची झुंडशाही सुरु केली आहे. हो, ही झुंडशाहीच वाटते. वाढलेल्या महागाईचे तुम्हाला काहीच सोयरसुतक वाटत नाही, हे लांच्छनास्पद आहे. केंद्र सरकारने निवडणुकीनंतर महागाई अध्यायाला सुरुवात केली आहे. त्यावर आवाज कोण उठवणार ? कॉंग्रेसने महागाईविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. तो आवाज केंद्र सरकारच्या कानात घुसणार आहे काय ?
सर्वसामान्य माणसाचे जगणे आणखी महाग होत आहे. सरकारने जीवनावश्यक वस्तुंची महागाई करुन जनतेला नागवले आहे. आता औषध दरवाढही लादली आहे. तुम्ही आजारी असाल तर महागडी औषधे विकत घेऊ शकत नाही. आम्ही देशाला कुठे नेऊन ठेवले आहे, याचा सरकारने विचार करावा. निवडणूक आली की आमच्या उत्साहाला उधाण येते.कोरोनाची चौथी लाट येईल किंवा न येईल, ती येऊच नये, पण रोज आदळणाऱ्या महागाईच्या लाटांचे काय करायचे? त्याला जनतेने कुठवर तोंड द्यायचे ? सर्व सामान्य जनतेने सुखाने जगूच नये अशीच एकंदर स्थिती देशाची झाली आहे. तुम्ही महागाईविरोधात बोलला तर तुम्हाला काहीजण देशद्रोही ठरवतील. ही विकृत मानसिकता वाढत आहे. कोरोना आटोक्यात आला असला तरी महागाईच्या लाटा दररोज सर्वसामान्य माणसाच्या अंगावर आदळत आहेत. कोरोना निर्बंधांपासून जनता जरा कुठे मोकळी होत आहे तर महागाईचा राक्षस पाठीमागे लागला आहे. हेच का ते अच्छे दिन ! अन्न, धान्य, डाळी, खाद्यतेले, इंधन,दळणवळण, शिक्षण फी,कर वाढले आहेत. आता सुमारे ८०० औषधांच्या किमतीही दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. या दरवाढीला औषध किंमत प्राधिकरणाची मंजुरी आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून विविध पेन किलर, अॅण्टिबायोटिक्स महाग होणार आहेत. केंद्र सरकारला गेली सात वर्षे झाली, देश चालवण्यासाठी पैसा अपुरा पडत आहे. इतर देशांना सल्ला देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या महत्वाच्या प्रश्नांवर मूग गिळून गप्प आहेत. त्यांच्याकडे उपाय नाही. आश्वासने देण्याएवढे ते सोपे नव्हे. प्रत्येक दरवाढीसाठी सामान्य माणसाने पैसे आणायचे कुठून? पेट्रोल-डिझेलची दरवाढ जशी केंद्र सरकारने पाच राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत रोखून धरली होती, तशी औषध दरवाढही रोखली होती असेच आता म्हणावे लागेल. अन्यथा पेट्रोल,डिझेलपाठोपाठ औषधांच्या दरवाढीला मंजुरी दिली गेली नसती. आधीच पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत. १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्याने जीएसटी, बचत खाते, फिक्स डिपॉझिट,एटीएमचे शुल्क इथपासून करप्रणालीपर्यंत अनेक नियम बदलणार आहेत. त्याचा बोजा सामान्य माणसाच्या खिशावर पडणार आहे. दुसरीकडे पीएफवरील व्याजदराला कात्री लावून केंद्र सरकारने सामान्य पगारदाराची भविष्यातील तरतूद कमी केली आहे. केंद्र सरकार म्हणते, आम्हाला कोणताही उद्योग करायचा नाही, असे म्हणत सरकारने खासगीकरणाच्या निमित्ताने सार्वजनिक सेवा, संस्था, उपक्रम, कंपन्या विकल्या. पुर्वीच्या सरकारने हेही ठेवले नसते तर काय विकले असते ?
महागाई करत सर्वसामान्याच्या खिशातील असलेले-नसलेले पैसेही काढून घ्यायचे आणि निवृत्तीनंतर बसा ठणाणा करत, अशी व्यवस्था सध्या सुरू आहे. नोटाबंदी,जीएसटी, कोरोना, लॉक डाऊन यामुळे आधीच सामान्य माणसाचे जगणे हराम झाले आहे. कोट्यवधींचे रोजगार गेले आहेत. भारतात गेल्या 45 वर्षांत जेवढी बेरोजगारी वाढली नव्हती, तेवढी मोदींच्या कार्यकाळात वाढली. तेव्हा कुठे होता छ्प्पन इंची बाणा ? सर्व सामान्य माणूस आज हताश झाला आहे. त्याला विकासाचे गाजर दाखवले जात आहे. बाकीच्यांना धार्मिक मुद्द्यांमध्ये जखडून ठेवले आहे. जे काही आहे, त्यात आपला आणि कुटुंबाचा रहाटगाडा सामान्य माणूस ढकलत आहे. कोरोना महामारीनंतर, महाग झालेले जीवन कसेबसे ढकलण्याचा आणि आहे त्यात सुख मानण्याचा प्रयत्न सामान्य माणूस करीत आहे. सर्वसामान्य माणसाला केंद्रीभूत मानून जेव्हा राज्यकर्ते देश चालवतील, तो सुदिन म्हणायचा. यापलिकडे सर्वसामान्य माणसाच्या हाती काहीच उरलेले नाही. विरोधकांनी सत्ताधारी प्रबळ आहेत म्हणून खचून जाण्यात काहीच राम नाही. जगण्यात राम असेल तर तो संघर्षात दिसला पाहीजे. तो दिसत नसेल तर विरोधकांनी एकीची मोट धरली पाहिजे, सत्ताधार्यांची चुकीची धोरणे जनतेच्या लक्षात आणुन दिली पाहिजेत. अन्यथा पुन्हा तेच होणार, जे जनता आता भोगत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
लढवय्ये बाबा
लढवय्ये बाबा
-
भारत- चीन संघर्ष : अमेरिकेची भूमिका अशोक सुतार / ८६००३१६७९८ भारत आणि चीन या शेजारी असलेल्या देशांत सध्या सिमाप्रश्नावरून तणाव सुरु आह...
-
देशात कोण कोणत्या धर्माचा, जातीचा किंवा त्याची विचारधारा अमुक असू शकते असे कयास अनेक जण लढवत असल्याचे दिसते. थोडक्यात देशात विविध विचारांव...
-
महागाईचा वरवंटा कोरोना महामारीमुळे माणसाचे जीवन असह्य झाले होते. लोकांनी कसाबसा कोरोनाचा काळ व्यतीत केला. कोरोना काळाचा फायदा घेत व्यापार्...

