लोकप्रिय पोस्ट
-
कोरोना लसीला स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त कशासाठी ? ब्लॉगर / अशोक सुतार करोनावरील लस उंबरठय़ावर आली असल्यास , ते वृत्त निश्चितच दिलासादायक. मा...
-
मराठी भाषा संस्कृती : संवर्धनाची जबाबदारी सर्वांची अशोक सुतार / ८६००३१६७९८ महाराष्ट्रात रविवारी मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. मर...
-
नागरिकांच्या प्रश्नावर केंद्र सरकार किती संवेदनशील ? देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. भारताचा जीडीपी उणे २३.९ असा नोंदला गेला आहे. जाग...
-
भारत- चीन संघर्ष : अमेरिकेची भूमिका अशोक सुतार / ८६००३१६७९८ भारत आणि चीन या शेजारी असलेल्या देशांत सध्या सिमाप्रश्नावरून तणाव सुरु आह...
-
बंगालमधील राजकारण ब्लॉगर / अशोक सुतार हल्ली ज्या राज्यात भाजपचे सरकार नसेल तिथे राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्याची नवी कल्पना येत ...
-
बँकांच्या खासगीकरणाचे पाऊल अशोक सुतार / ८६००३१६७९८ केंद्र सरकारकडून लवकरच चार बँकांचे खासगीकरण करण्याची तयारी सुरु आहे. या...
-
ऑनलाईन शिक्षण दूरदर्शन व आकाशवाणीचा पर्याय दूरदर्शन व आकाशवाणी ही केंद्र सरकारची प्रसारमाध्यमे राजकीय कामासाठी केंद्रीय मंत्र्यांकडून...
-
पडद्यावरचा खलनायक ते लॉकडाऊन हिरो अशोक सुतार / ८६००३१६७९८ ब्लॉगर / अशोक सुतार पडद्यावरचा खलनायक ते लॉकडाऊन काळातील नायक सोनु सूदची ...
-
ढासळत्या अर्थव्यवस्थेवर सोन्याची मात्रा ? ब्लॉगर : अशोक सुतार / ८६००३१६७९८ ब्लॉगर / अशोक सुतार आज कोरोनाची गंभीर परिस्थिती ...
कलाकार आणि राजकीय प्रतिमा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
कलाकार आणि राजकीय प्रतिमा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२
कलाकार आणि राजकीय प्रतिमा
देशात कोण कोणत्या धर्माचा, जातीचा किंवा त्याची विचारधारा अमुक असू शकते असे कयास अनेक जण लढवत असल्याचे दिसते. थोडक्यात देशात विविध विचारांवर चर्चा करण्यापेक्षा वादच जास्त प्रमाणात सुरु आहेत, असे दिसते. देशात विसंवादाचे वातावरण निर्माण झालेले दिसत आहे. काही दिवसांपूर्वी किरण माने या टीव्ही चॅनेलवरील अभिनेत्याला मराठी मालिकेतून काढण्याचा प्रयत्न झाला. सदर अभिनेत्याचे विचार पुरोगामी आहेत, असा शिक्का मारत चॅनेलने माने यांना मालिकेतून दूर केले आहे. यावरून वादन रंगला आहे. असे असताना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने नवा वाद रंगण्याची शक्यता आहे. अमोल कोल्हे यांच्या व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ३० जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यावर अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून या चित्रपटाचे शूटिंग आपण राजकारणात येण्याच्या आधीच झाले होते, असे त्यांनी म्हटले आहे. असे असले तरी अमोल कोल्हे यांच्यावर टीका ही होणारच असे दिसते. नथुराम गोडसे हा महात्मा गांधीजींचा खुनी होता, हे कुणीही नाकारू शकत नाही. परंतु गोडसेची भूमिका चित्रपटात करणे गैर नाही. कलेच्या प्रांतात कोण व्हिलन, कुणी हिरो अशी भूमिका साकारत असते. त्यामुळे कलावंताचे प्रामाणिक कार्य हे की, त्याने कोणतीही भूमिका मनापासून करावी, हेच असते. नथुराम गोडसेची भूमिका केल्यामुळे जर अमोल कोल्हे यांच्यावर टीका होणार असेल तर हे असहिष्णू प्रकारचे वर्तन टीका करणाऱ्यांकडून होत आहे, असेच म्हणता येईल.
अमोल कोल्हे हे हाडाचे कलाकार आहेत. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली होती, त्यावेळी लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले होते. संभाजी महाराजांच्या भूमिकेत अमोल कोल्हे यांनी जीव ओतला होता. ती भूमिका ते अक्षरशः जगले. लाखो प्रेक्षकांनी अमोल कोल्हे यांच्यावर जीव ओवाळून टाकला होता. कलाकाराला त्या भूमिकेशी जोडले जाणे, कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही. अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका केली नसती तर दुसऱ्या कोणीतरी ती केली असती. २०१७ साली व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. त्यावेळी अमोल कोल्हे यांनी कोणत्याही सक्रिय राजकारणात नसताना गोडसे यांची भूमिका साकारली होती. कलाकार एखादी भूमिका करतो म्हणजे त्या विचारधारेसोबत सहमत असतो, असे नसते. कलाकाराच्या वाट्याला जी भूमिका येईल, ती करणे कलाकाराचा धर्म असतो. अमोल कोल्हे यांच्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यात नथुराम गोडसेच्या उदात्तीकरणाच्या संदर्भात त्यानी कधीही भूमिका घेतलेली नाही. केवळ एक कलाकार म्हणून भूमिका साकारणे आणि त्याचा राजकीय विचारांसोबत संबंध जोडला जाणे या दोन विभिन्न गोष्टी आहेत, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. कोल्हे यांनी म्हटले आहे की, कलाकार म्हणून माझ्याकडे ही भूमिका आली होती आणि ती मी साकारली. माझी विचारधारा त्या पात्राशी जुळेल, असे नाही. विचारधारेचा जेव्हा मी प्रचार आणि प्रसार करतो आणि माझी राजकीय विचारधारा ही वेगळी गोष्ट आहे. व्यक्ती म्हणून मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. चार पाच वर्षापूर्वी केलेला सिनेमा आहे. कलाकार आणि राजकीय प्रतिमा या दोन गोष्टींची गल्लत केली जाऊ नये अशी माझी अपेक्षा आहे, असे अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. गेल्या सात वर्षांत देशात विभाजनवादी मते मांडण्याची पद्धत सुरु झाली आहे. त्यामागे कट्टर धर्मवाद हे कारण असावे, असे वाटते. हिंदू सहिष्णू असावेत, असे म्हटले जाते, परंतु तसे दिसून येत नाही, हे देशात अनेक ठिकाणी झालेल्या धर्म संसदेतील काही संत – महंतांच्या वक्तव्यातून दिसून आले आहे. धर्मातील अधिकारी व्यक्ती म्हणजे संत- महंत, महाराज होत. परंतु त्यांचे मानसिक संतुलन बिघडले की काय असे वाटण्याइतपत वक्तव्यांमध्ये विखारीपणा दिसून येत आहे. अमुक धर्माच्या लोकांना मारले पाहिजे, देशातून हाकलून दिले पाहिजे अशी वक्तव्ये बिनधास्तपणे केली जात आहेत. विशेष म्हणजे, सर्वसामान्य माणसाला साधू- संत मंडळी आदर्श वाटतात. जेव्हा अशी मंडळी विपरीत काही बोलत असतील, महात्मा गांधींबद्दल अपशब्द बोलत असतील तर लोकही उद्दीपित होतात, हिंसक होऊ शकतात. असे होत असताना महात्मा गांधीजींची हत्या करणारा नथुराम गोडसे खलनायक म्हणून समोर येतो. दुसरा गट गोडसेवर टीका करण्यात धन्यता मानतो. त्यातूनच, कलाकार जर एखाद्या राजकीय पक्षाचा सदस्य असेल तर त्याला टार्गेट केले जाते. तसाच काहीसा प्रकार अमोल कोल्हे यांच्याबाबत झाला असू शकतो. नथुराम गोडसेची भूमिका केली म्हणून अमोल कोल्हे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे, कोल्हे यांच्याकडे राजकीय दृष्टीकोनातून टीका करणार हे उघड आहे. परंतु कॉंग्रेसने अमोल कोल्हे यांचा व्हाय आय किल्ड गांधी हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याची भूमिका घेतली आहे, हे विशेष आहे. कॉंग्रेसची विचारधारा पुरोगामी असताना ते जर टोकाची भूमिका घेत असतील तर कोणत्याही पक्षात फक्त राजकारणच केले जाते, असा संदेश बाहेर जाऊ शकतो. राजकीय क्षेत्रात सहिष्णू, असहिष्णू असा काही प्रकार नसतो. तिथे आग लावून मजा बघण्यातच अनेकांना धन्यता वाटू लागली आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे की, राजकीय भूमिका घेणे हा प्रत्येकाचा स्वतंत्र विषय आहे. माझ्या पक्षातल्या लोकांना याला विरोध केला तर वैषम्य वाटण्याचे कारण नाही. कारण ही राजकीय भूमिका आहे. माझ्या पक्षश्रेष्ठींना हे मी कळवले आहे, असे कोल्हे यांनी म्हटले आहे. कलाकारांना कोणताही धर्म, जात नसते, हे एकदा रसिक प्रेक्षकांनी समजून घेतले पाहिजे. खरे रसिक ते समजावून घेतात आणि ज्यांना यात काहीतरी काळेबेरे करायचे आहे, ते मात्र अशा गोष्टींचे भांडवल करून एखाद्याची प्रतिमा खराब करतात. प्रतिभा असेल तरच कलाकाराची प्रतिमा उंचावते. त्यामुळे प्रतिभावान कलाकाराला कोणीही बदनाम करू शकत नाही. राजकारणात मात्र कोणालाही बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जाते, अमोल कोल्हेंवरील टीका हा त्यातीलच एक प्रकार असावा असे वाटते.
अशोक सुतार
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
लढवय्ये बाबा
लढवय्ये बाबा
-
भारत- चीन संघर्ष : अमेरिकेची भूमिका अशोक सुतार / ८६००३१६७९८ भारत आणि चीन या शेजारी असलेल्या देशांत सध्या सिमाप्रश्नावरून तणाव सुरु आह...
-
देशात कोण कोणत्या धर्माचा, जातीचा किंवा त्याची विचारधारा अमुक असू शकते असे कयास अनेक जण लढवत असल्याचे दिसते. थोडक्यात देशात विविध विचारांव...
-
महागाईचा वरवंटा कोरोना महामारीमुळे माणसाचे जीवन असह्य झाले होते. लोकांनी कसाबसा कोरोनाचा काळ व्यतीत केला. कोरोना काळाचा फायदा घेत व्यापार्...