लोकप्रिय पोस्ट
-
कोरोना लसीला स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त कशासाठी ? ब्लॉगर / अशोक सुतार करोनावरील लस उंबरठय़ावर आली असल्यास , ते वृत्त निश्चितच दिलासादायक. मा...
-
मराठी भाषा संस्कृती : संवर्धनाची जबाबदारी सर्वांची अशोक सुतार / ८६००३१६७९८ महाराष्ट्रात रविवारी मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. मर...
-
नागरिकांच्या प्रश्नावर केंद्र सरकार किती संवेदनशील ? देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. भारताचा जीडीपी उणे २३.९ असा नोंदला गेला आहे. जाग...
-
भारत- चीन संघर्ष : अमेरिकेची भूमिका अशोक सुतार / ८६००३१६७९८ भारत आणि चीन या शेजारी असलेल्या देशांत सध्या सिमाप्रश्नावरून तणाव सुरु आह...
-
बंगालमधील राजकारण ब्लॉगर / अशोक सुतार हल्ली ज्या राज्यात भाजपचे सरकार नसेल तिथे राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्याची नवी कल्पना येत ...
-
बँकांच्या खासगीकरणाचे पाऊल अशोक सुतार / ८६००३१६७९८ केंद्र सरकारकडून लवकरच चार बँकांचे खासगीकरण करण्याची तयारी सुरु आहे. या...
-
ऑनलाईन शिक्षण दूरदर्शन व आकाशवाणीचा पर्याय दूरदर्शन व आकाशवाणी ही केंद्र सरकारची प्रसारमाध्यमे राजकीय कामासाठी केंद्रीय मंत्र्यांकडून...
-
पडद्यावरचा खलनायक ते लॉकडाऊन हिरो अशोक सुतार / ८६००३१६७९८ ब्लॉगर / अशोक सुतार पडद्यावरचा खलनायक ते लॉकडाऊन काळातील नायक सोनु सूदची ...
-
ढासळत्या अर्थव्यवस्थेवर सोन्याची मात्रा ? ब्लॉगर : अशोक सुतार / ८६००३१६७९८ ब्लॉगर / अशोक सुतार आज कोरोनाची गंभीर परिस्थिती ...
रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२
मराठी भाषा संस्कृती : संवर्धनाची जबाबदारी सर्वांची
मराठी भाषा संस्कृती : संवर्धनाची जबाबदारी सर्वांची
अशोक सुतार / ८६००३१६७९८
महाराष्ट्रात रविवारी मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जां मिळण्याची मागणी अभिजात मराठी भाषा समितीने खूप वर्षांपूर्वी केंद्र सरकारकडे केली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी होते, त्यावेळी मराठी भाषकांची जबाबदारी ही की, त्यांनी मराठी भाषेचे जुने संदर्भ, पुरातन काळातील ताम्रपट,कोरीव लेख, शिलालेखांचे संदर्भ इ. प्राचीन दस्तावेज समोर आणले पाहिजेत. ही जबाबदारी मराठी भाषेचे अभ्यासक / तज्ज्ञ यांची आहे. तसेच ती जाणकार मराठी भाषकांचीही आहे. नागरिकांनी मराठी भाषेचा वापर व्यवहारामध्ये करणे गरजेचे आहे. तरच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळू शकेल. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी खूप काळ घेतला आहे. अजूनही मराठीला अभिजात दर्जा मिळालेला नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संशोधन केल्यास अत्यंत महत्वाचे ऐवज आढळतील. परंतु मराठी भाषकांनी हे गांभीर्याने घेतले पाहिजे. मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत महत्वाचा पुरावा मानता येईल, अशा हजार वर्षांपूर्वीचा पहिला मराठी शिलालेख आजही दुर्लक्षित स्वरूपात आहे. सोलापूरजवळील हत्तर कुडल संगम येथील प्राचीन संगमेश्वर मंदिरात अस्तित्वात असलेला हा मराठीतील पहिला शिलालेख शासकीय स्तरावर बेदखलच ठरला आहे. दुसरीकडे काही राजकारणी मंडळींनी या शिलालेखाच्या सहस्त्राब्दी वर्ष शासनाकडून साजरा करण्याच्या नुसत्या बाता मारून स्वतःच्या नावाच्या डंका पिटण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. मराठी भाषेच्या समृद्धीसाठी सर्वांनी झटले पाहिजे. तरच मराठी भाषेला प्रतिष्ठा मिळेल.
सोलापूर-विजापूर मार्गावर सोलापूरपासून सुमारे ४० किलोमीटर अंतरावर दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंग कुडल येथे भीमा व सीना नदीच्या संगमावर संगमेश्वर आणि श्री हरिहरेश्वर ही दोन प्राचीन हेमाडपंथी मंदिरे आहेत. यापैकी श्री संगमेश्वर मंदिराच्या सभामंडपाच्या घडीव तुळईवर इसवी सन १०१८ साली (शके ९४०) कोरलेला मराठी शिलालेख आहे. या शिलालेखाचा शोध सोलापूरचे दिवंगत अभ्यासक आनंद कुंभार यांनी लावला आहे. मराठी भाषेतील आद्यग्रंथ श्री ज्ञानेश्वरीच्या १८२ वर्षे अगोदरचा जुना असा हा शिलालेख आहे. संशोधक आनंद कुंभार यांनी यासंदर्भात दिलेल्या पुराव्याला पुण्याचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. शं. गो. तुळपुळे आणि वि. ल. भावे यांनीही पुष्टी देताना हा मराठी शिलालेख सर्वात पुरातन असल्याचा निर्वाळा दिला आहे. या शिलालेखाची लांबी ९४ सेंमी तर रूंदी १६ सेंमी आहे. त्यावरील अक्षरांची उंची सुमारे एक सेंमी आहे. या शिलालेखाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे त्यात संस्कृत आणि मराठी भाषेचा संगम झाला आहे. शिलालेखावर अडीच ओळी लिहिल्या आहेत. पहिली ओळ ‘ ॐ स्वस्ति श्री सकु ९४० काळयुक्त संवत्सर माघ सु कधानुळी काळछळा ‘ आहे. तर दुसरी ओळ ‘ पंडित गछतो आयाता मछ..मि छिगळ नि १००० ‘ अशी आहे. तिसरी ओळ ‘ वाछि तो विजेयां होऐवा || याप्रमाणे शुध्द मराठी भाषेत लिहिली आहे.
मराठी भाषा केव्हापासून बोलू जाऊ लागली, याचा काळ जरी सिध्द करता आला नाही तरी ती केव्हापासून अक्षरबध्द झाली हे शिलालेखावरून सांगता येते. शिलालेखांचा अभ्यास करताना कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील श्री गोमटेश्वर-बाहुबलीच्या चरणांपाशी ‘ चामुण्डराये करवियले | गंगाराये सुत्ताले करवियले| असा मजकूर असलेला पहिला मराठी शिलालेख मानला जात होता. परंतु पुढील काळात नव्या संशोधनात रायगड जिल्ह्यातील आक्षी येथील इसवी सन १०१२ (शके ९३४) मधील शिलालेख सापडला. त्यामुळे हा शिलालेख मराठी भाषेतील पहिला शिलालेख म्हणून समोर आला. तथापि, या शिलालेखातही काळाचे वाचन चुकीचे झाले असून त्याचे खरे वाचन शके ११३२ असे आहे, ही बाब काही संशोधकांनी पुढे आणली. दिवे आगर (रत्नागिरी) येथील ताम्रपट शके ९७१ (इसवी सन १०४९) मधील आहे. परंतु हा ताम्रपटही मराठी भाषेतील पहिला लिखित पुरावा ठरला गेला नाही. कारण सोलापूर जिल्ह्यातील हत्तरसंग कुडल येथील नव्याने सापडलेल्या मराठी भाषेतील शिलालेखाचा काळ इसवी सन १०१८ (शके ९४०) निश्चित आहे. मराठी भाषेतील स्पष्ट कालोलिखित असलेला हा शिलालेख आजही सुरक्षित आहे. कोण्या एका काळामुख यतीला एक सहत्र निवर्तन भूमी वा निष्क (तत्कालीन चलन) देणगी म्हणून दिलेली आहे, अशा आशयाचा अर्थ असलेल्या या मराठीतील शिलालेखाला २०१९ साली एक हजार वर्षे पूर्ण झाली आहेत. मराठीतील या पहिल्या आणि आद्य शिलालेखाची सहस्त्राब्दी शासकीय पातळीवर साजरी करण्याची घोषणा तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केली होती. त्यासाठी तत्कालीन सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समितीही गठीत झाली होती. यानिमित्ताने मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील या महत्वाच्या ठेव्याचे संवर्धन होईल, अशी अपेक्षा होती. परंतु प्रत्यक्षात या शिलालेखाची सहस्राब्दी वर्ष शासनाच्या स्तरावर झालीच नाही. आजही हा ठेवा मोलाचा असूनही दुर्लक्षितच आहे. म्हणजेच मराठी भाषेच्या दुरवस्थेस मराठी भाषिक लोक जबाबदार असल्याचे दिसते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी केली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी राज्य सरकारने सर्व बाबींची पूर्तता करूनही केंद्र सरकार याबाबत निर्णय घेत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा सर्व कार्यालयांत सक्तीची केली असून ज्या शिक्षण संस्थेत मराठी शिकवले जाणार नाही, त्यांना दंड व पहिली ते दहावी शाळांना मराठी विषय सक्तीचा केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवला आहे, तो योग्यच आहे. भाषा टिकवायची असेल तर ती भाषा सर्वसमावेशक असायला हवी. मातृभाषेतून शिक्षण घेतले तर ज्ञान लवकर अवगत होते, नंतर प्रयत्नपूर्वक इंग्रजी भाषा अवगत करता येते.मातृभाषेतून शिकून आत्तापर्यंत अनेकजण मोठया पदावर गेले आहेत, जागतिक पातळीवर काहींनी यश मिळवले आहे. परंतु सध्या इंग्रजी भाषेतून शिकण्याचे व मराठी म्हणजे हीन दर्जाची असे समजण्याचे एक फॅड आले आहे. पालकांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.मराठीत विविध पातळयांवर संशोधनात्मक लेखन होणे गरजेचे आहे. हा दीर्घकालीन प्रयत्न आहे, परंतु मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. मराठीत विविध विषयांवर लिहिलेल्या पुस्तकांचा फायदा लोकशिक्षणासाठी व्यवहारात करता येणे शक्य आहे.मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक महाराष्ट्रीय नागरिकाची आहे. त्यासाठी सामाजिक दबाव उभा करणे, प्रत्यक्ष कृती करणे ही शिक्षित मध्यमवर्गांची जबाबदारी आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लढवय्ये बाबा
लढवय्ये बाबा
-
भारत- चीन संघर्ष : अमेरिकेची भूमिका अशोक सुतार / ८६००३१६७९८ भारत आणि चीन या शेजारी असलेल्या देशांत सध्या सिमाप्रश्नावरून तणाव सुरु आह...
-
देशात कोण कोणत्या धर्माचा, जातीचा किंवा त्याची विचारधारा अमुक असू शकते असे कयास अनेक जण लढवत असल्याचे दिसते. थोडक्यात देशात विविध विचारांव...
-
महागाईचा वरवंटा कोरोना महामारीमुळे माणसाचे जीवन असह्य झाले होते. लोकांनी कसाबसा कोरोनाचा काळ व्यतीत केला. कोरोना काळाचा फायदा घेत व्यापार्...
Nice
उत्तर द्याहटवा