लोकप्रिय पोस्ट
-
कोरोना लसीला स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त कशासाठी ? ब्लॉगर / अशोक सुतार करोनावरील लस उंबरठय़ावर आली असल्यास , ते वृत्त निश्चितच दिलासादायक. मा...
-
मराठी भाषा संस्कृती : संवर्धनाची जबाबदारी सर्वांची अशोक सुतार / ८६००३१६७९८ महाराष्ट्रात रविवारी मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. मर...
-
नागरिकांच्या प्रश्नावर केंद्र सरकार किती संवेदनशील ? देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. भारताचा जीडीपी उणे २३.९ असा नोंदला गेला आहे. जाग...
-
भारत- चीन संघर्ष : अमेरिकेची भूमिका अशोक सुतार / ८६००३१६७९८ भारत आणि चीन या शेजारी असलेल्या देशांत सध्या सिमाप्रश्नावरून तणाव सुरु आह...
-
बंगालमधील राजकारण ब्लॉगर / अशोक सुतार हल्ली ज्या राज्यात भाजपचे सरकार नसेल तिथे राष्ट्रपती राजवटीची मागणी करण्याची नवी कल्पना येत ...
-
बँकांच्या खासगीकरणाचे पाऊल अशोक सुतार / ८६००३१६७९८ केंद्र सरकारकडून लवकरच चार बँकांचे खासगीकरण करण्याची तयारी सुरु आहे. या...
-
ऑनलाईन शिक्षण दूरदर्शन व आकाशवाणीचा पर्याय दूरदर्शन व आकाशवाणी ही केंद्र सरकारची प्रसारमाध्यमे राजकीय कामासाठी केंद्रीय मंत्र्यांकडून...
-
पडद्यावरचा खलनायक ते लॉकडाऊन हिरो अशोक सुतार / ८६००३१६७९८ ब्लॉगर / अशोक सुतार पडद्यावरचा खलनायक ते लॉकडाऊन काळातील नायक सोनु सूदची ...
-
ढासळत्या अर्थव्यवस्थेवर सोन्याची मात्रा ? ब्लॉगर : अशोक सुतार / ८६००३१६७९८ ब्लॉगर / अशोक सुतार आज कोरोनाची गंभीर परिस्थिती ...
मंगळवार, २९ मार्च, २०२२
महागाईचा वरवंटा
महागाईचा वरवंटा
कोरोना महामारीमुळे माणसाचे जीवन असह्य झाले होते. लोकांनी कसाबसा कोरोनाचा काळ व्यतीत केला. कोरोना काळाचा फायदा घेत व्यापार्यांनी जगणे महाग आणि मरण स्वस्त अशी अवस्था लोकांची केली होती. हे महागडे जीवन, वाढती बेरोजगारी, वाढती महागाई, लोकांनी कसे जगायचे, याचे उत्तर देशाचे अर्थमंत्री, पंतप्रधान देऊ शकत नाहीत. आयुष्य कसेबसे ढकलण्याचा आणि जगण्यातच सुख मानण्याचा प्रयत्न सामान्य माणूस करीत आहे. मात्र, केंद्र सरकारला याची पर्वाच नाही. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर सरकारने महागाईचा हाहाकार माजवला आहे. कश्मीर फाईल्स या चित्रपटाचे आणि त्या अनुषंगाने काही विशिष्ट विचारांचे उदात्तीकरण सुरु आहे. फिल्म पहा आणि सर्व दु:ख सहन करा, असेच सरकारला म्हणायचे आहे काय ? काही जणांनी तर महागाईचा जराही उच्चार न करता त्या चित्रपटाला करमुक्त करा, अशी सामाजिक मागणी करण्याची झुंडशाही सुरु केली आहे. हो, ही झुंडशाहीच वाटते. वाढलेल्या महागाईचे तुम्हाला काहीच सोयरसुतक वाटत नाही, हे लांच्छनास्पद आहे. केंद्र सरकारने निवडणुकीनंतर महागाई अध्यायाला सुरुवात केली आहे. त्यावर आवाज कोण उठवणार ? कॉंग्रेसने महागाईविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. तो आवाज केंद्र सरकारच्या कानात घुसणार आहे काय ?
सर्वसामान्य माणसाचे जगणे आणखी महाग होत आहे. सरकारने जीवनावश्यक वस्तुंची महागाई करुन जनतेला नागवले आहे. आता औषध दरवाढही लादली आहे. तुम्ही आजारी असाल तर महागडी औषधे विकत घेऊ शकत नाही. आम्ही देशाला कुठे नेऊन ठेवले आहे, याचा सरकारने विचार करावा. निवडणूक आली की आमच्या उत्साहाला उधाण येते.कोरोनाची चौथी लाट येईल किंवा न येईल, ती येऊच नये, पण रोज आदळणाऱ्या महागाईच्या लाटांचे काय करायचे? त्याला जनतेने कुठवर तोंड द्यायचे ? सर्व सामान्य जनतेने सुखाने जगूच नये अशीच एकंदर स्थिती देशाची झाली आहे. तुम्ही महागाईविरोधात बोलला तर तुम्हाला काहीजण देशद्रोही ठरवतील. ही विकृत मानसिकता वाढत आहे. कोरोना आटोक्यात आला असला तरी महागाईच्या लाटा दररोज सर्वसामान्य माणसाच्या अंगावर आदळत आहेत. कोरोना निर्बंधांपासून जनता जरा कुठे मोकळी होत आहे तर महागाईचा राक्षस पाठीमागे लागला आहे. हेच का ते अच्छे दिन ! अन्न, धान्य, डाळी, खाद्यतेले, इंधन,दळणवळण, शिक्षण फी,कर वाढले आहेत. आता सुमारे ८०० औषधांच्या किमतीही दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. या दरवाढीला औषध किंमत प्राधिकरणाची मंजुरी आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून विविध पेन किलर, अॅण्टिबायोटिक्स महाग होणार आहेत. केंद्र सरकारला गेली सात वर्षे झाली, देश चालवण्यासाठी पैसा अपुरा पडत आहे. इतर देशांना सल्ला देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या महत्वाच्या प्रश्नांवर मूग गिळून गप्प आहेत. त्यांच्याकडे उपाय नाही. आश्वासने देण्याएवढे ते सोपे नव्हे. प्रत्येक दरवाढीसाठी सामान्य माणसाने पैसे आणायचे कुठून? पेट्रोल-डिझेलची दरवाढ जशी केंद्र सरकारने पाच राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत रोखून धरली होती, तशी औषध दरवाढही रोखली होती असेच आता म्हणावे लागेल. अन्यथा पेट्रोल,डिझेलपाठोपाठ औषधांच्या दरवाढीला मंजुरी दिली गेली नसती. आधीच पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत. १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असल्याने जीएसटी, बचत खाते, फिक्स डिपॉझिट,एटीएमचे शुल्क इथपासून करप्रणालीपर्यंत अनेक नियम बदलणार आहेत. त्याचा बोजा सामान्य माणसाच्या खिशावर पडणार आहे. दुसरीकडे पीएफवरील व्याजदराला कात्री लावून केंद्र सरकारने सामान्य पगारदाराची भविष्यातील तरतूद कमी केली आहे. केंद्र सरकार म्हणते, आम्हाला कोणताही उद्योग करायचा नाही, असे म्हणत सरकारने खासगीकरणाच्या निमित्ताने सार्वजनिक सेवा, संस्था, उपक्रम, कंपन्या विकल्या. पुर्वीच्या सरकारने हेही ठेवले नसते तर काय विकले असते ?
महागाई करत सर्वसामान्याच्या खिशातील असलेले-नसलेले पैसेही काढून घ्यायचे आणि निवृत्तीनंतर बसा ठणाणा करत, अशी व्यवस्था सध्या सुरू आहे. नोटाबंदी,जीएसटी, कोरोना, लॉक डाऊन यामुळे आधीच सामान्य माणसाचे जगणे हराम झाले आहे. कोट्यवधींचे रोजगार गेले आहेत. भारतात गेल्या 45 वर्षांत जेवढी बेरोजगारी वाढली नव्हती, तेवढी मोदींच्या कार्यकाळात वाढली. तेव्हा कुठे होता छ्प्पन इंची बाणा ? सर्व सामान्य माणूस आज हताश झाला आहे. त्याला विकासाचे गाजर दाखवले जात आहे. बाकीच्यांना धार्मिक मुद्द्यांमध्ये जखडून ठेवले आहे. जे काही आहे, त्यात आपला आणि कुटुंबाचा रहाटगाडा सामान्य माणूस ढकलत आहे. कोरोना महामारीनंतर, महाग झालेले जीवन कसेबसे ढकलण्याचा आणि आहे त्यात सुख मानण्याचा प्रयत्न सामान्य माणूस करीत आहे. सर्वसामान्य माणसाला केंद्रीभूत मानून जेव्हा राज्यकर्ते देश चालवतील, तो सुदिन म्हणायचा. यापलिकडे सर्वसामान्य माणसाच्या हाती काहीच उरलेले नाही. विरोधकांनी सत्ताधारी प्रबळ आहेत म्हणून खचून जाण्यात काहीच राम नाही. जगण्यात राम असेल तर तो संघर्षात दिसला पाहीजे. तो दिसत नसेल तर विरोधकांनी एकीची मोट धरली पाहिजे, सत्ताधार्यांची चुकीची धोरणे जनतेच्या लक्षात आणुन दिली पाहिजेत. अन्यथा पुन्हा तेच होणार, जे जनता आता भोगत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लढवय्ये बाबा
लढवय्ये बाबा
-
भारत- चीन संघर्ष : अमेरिकेची भूमिका अशोक सुतार / ८६००३१६७९८ भारत आणि चीन या शेजारी असलेल्या देशांत सध्या सिमाप्रश्नावरून तणाव सुरु आह...
-
देशात कोण कोणत्या धर्माचा, जातीचा किंवा त्याची विचारधारा अमुक असू शकते असे कयास अनेक जण लढवत असल्याचे दिसते. थोडक्यात देशात विविध विचारांव...
-
महागाईचा वरवंटा कोरोना महामारीमुळे माणसाचे जीवन असह्य झाले होते. लोकांनी कसाबसा कोरोनाचा काळ व्यतीत केला. कोरोना काळाचा फायदा घेत व्यापार्...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा