काळजी
घ्या, सतर्क राहा
अशोक
सुतार /
८६००३१६७९८
उत्तरप्रदेशात मुंबईहून पोहोचलेल्या काही कामगारांनी एक व्हिदिओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आम्ही उत्तरप्रदेशात आलो. पण लोकांनी आम्हाला ना अन्न ना पाण्यासाठी विचारले. प्रदेश बदलला की मानवी वर्तन का बदलते ? महाराष्ट्र मात्र सर्वांना सामावून घेणारे राज्य आहे. म्हणूनच मुंबईत कामगार वस्त्या, झोपडपट्ट्या जास्त आहेत आणि कोरोनाबाधीतही ! इतर राज्यांना आपली माणसे जड का होत आहेत ? त्यांना त्यांच्या राज्यात या गरीब लोकांना रोजगार देता येत नाही ही शरमेची बाब आहे. असो कोरोना काळ आहे,मानवीय दृष्टीकोनातून सर्वांचा विचार केला पाहिजे, राजकारणी मात्र कोरोनाकाळातही आंदोलने करीत आहेत, ही मोठी विचित्र घटना आहे. कोरोना काळात राजकारण कसे सुचत असेल ? महाराष्ट्रातील नागरिकांची विचारपूस करा, त्यांना मानवीय दृष्टीकोनातून मदत करा, केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी विरोधकांनी व राज्य सरकारने मिळून मदत मागितली पाहिजे. आज नागरिक हे सर्व पहात आहे, तो नागरिक वेळ आल्यावर धडा शिकवणार ! म्हणूनच कोरोना काळ गंभीरपणे घ्या.
मुंबईत कोरोनाचे हजारो रुग्ण आहेत आणि दुर्दैवाने त्यांच्यासाठी रुग्णालयात जागा शिल्लक नाही, अशी वाईट अवस्था मुंबईतील कोणत्याही हॉस्पिटलमध्ये आहे. केईएएम , नायर, राजावाडी अशा बड्या सरकारी व पालिका रुग्णालात बेड उपलब्ध नाही, असे सांगून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना घरी पाठवले जाते, हे मानवतेला कलंक फासणारे आहे. कोरोनाचे अनेक रुग्ण औषध द्या असा आग्रह करत रुग्णालयासमोर आहेत, पण त्यांची दाखल कोणीही घेत नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.महाराष्ट्रात सध्या १६३५ जन कोरोनाच्या साथीमुळे दगावले आहेत तर देशात ही संख्या ४०२१ आहे. महाराष्ट्रातील मुंबई,ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर ही शहरे कोरोनाच्या हिटलिस्टवर आहेत. मुंबईत तर लोकांची अवस्था वाईट झाली आहे. उन्हाळा आहे, त्यामुळे गरम होत आहे. दुसरीकडे गेली तीन महिने हाताला काम नाही. अशा अवस्थेत घरमालक भाडे देण्यासाठी तगादा लावत आहेत. किराणा दुकानदाराकडे उधारी करायची तर किती दिवस, हा प्रश्न मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांसमोर आहे. त्यांचे काही नातेवाईक गावाकडून रक्कम पाठवत आहेत. गावी जावे तर कोरोन्टाइन होऊन चौदा दिवस गावाबाहेर थांबावे लागणार, आज गावाकडे मुंबईतून आलेल्या लोकांमुळे कोरोना पसरला आहे. ग्रामीण भागात एक तर रुग्णालयात साधने अपुरी आहेत. त्यात कर्मचारी कमी आहेत, ते कोणाकडे पाहणार, असा सर्व गावाकडे प्रकार आहे. कोरोनामुळे लोकांना अनेक धडे मिळाले आहेत, जगायचे कसे, कुणाबरोबर कसा व्यवहार केला पाहिजे, हे सर्व कोरोनाच्या काळात शिकायला मिळाले आहे. कोरोनाने ओठा अनुभव दिला. गरीब, मजूर, कष्टकर्यांची हालत वाईट आहे. हे कामगार गावी जाण्यासाठी प्राण कंठाशी आणून पास, रेल्वेगाडीची वाट पहात आहेत. परंतु सर्वत्र हाउसफुल असल्यामुळे परप्रांतीय कामगारांनी सरकारच्या सुविधेची वाट न पाहता एकाला चलो रे सारखे पायी चालत शेकडी मैल गावाची वाट धरली आहे. महाराष्ट्रात हे मजूर जिथून जात आहेत, तोवर त्यांची अन्न-पाण्याची, निवार्याची सोय होत आहे. परंतु उत्तरप्रदेशात मुंबईहून पोहोचलेल्या काही कामगारांनी एक व्हिदिओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आम्ही उत्तरप्रदेशात आलो. पण लोकांनी आम्हाला ना अन्न ना पाण्यासाठी विचारले. प्रदेश बदलला की मानवी वर्तन का बदलते ? महाराष्ट्र मात्र सर्वांना सामावून घेणारे राज्य आहे. म्हणूनच मुंबईत कामगार वस्त्या, झोपडपट्ट्या जास्त आहेत आणि कोरोनाबाधीतही ! इतर राज्यांना आपली माणसे जड का होत आहेत ? त्यांना त्यांच्या राज्यात या गरीब लोकांना रोजगार देता येत नाही ही शरमेची बाब आहे. असो कोरोना काळ आहे,मानवीय दृष्टीकोनातून सर्वांचा विचार केला पाहिजे, राजकारणी मात्र कोरोनाकाळातही आंदोलने करीत आहेत, ही मोठी विचित्र घटना आहे. कोरोना काळात राजकारण कसे सुचत असेल ? महाराष्ट्रातील नागरिकांची विचारपूस करा, त्यांना मानवीय दृष्टीकोनातून मदत करा, केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी विरोधकांनी व राज्य सरकारने मिळून मदत मागितली पाहिजे. आज नागरिक हे सर्व पहात आहे, तो नागरिक वेळ आल्यावर धडा शिकवणार ! म्हणूनच कोरोना काळ गंभीरपणे घ्या. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. पण रुग्णालयात दाखल होऊ शकले नाहीत आणि दाखल केले गेले नाहीत असे हजारो कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण अजून आहेत. याचा अर्थ आरोग्य साधने अपुरी आहेत. कोरोनाची चाचणी केली तर लवकर रिपोर्ट येत नाही. महाराष्ट्रात हे सर्व गतिमान करण्यासाठी पुरेसे किट, औषधे, खाटा, आरोग्य यंत्रणा सुसज्ज हवे आहे. हे म्हणून सर्व सुसज्ज होणार नाही. तर त्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता फंडात सर्वांनी रक्कम टाकली पाहिजे. विरोधकांनी परवा आंदोलने केली, कारण काय तर महाराष्ट्रातील रुग्णालयांत योग्य सेवा देत नाहीत. परंतु आंदोलने करणार्यांनी कोरोना काळातील मदतीची रककम पक्ष निधीत जमा केली. वरून हे राज्य सरकारविरोधात आंदोलने करायला रिकामे ! राज्यात योग्य सुविधा नागरिकांना मिळाव्या असे वाटत असेल तर राज्याच्या मुख्यमंत्री सहाय्यता फंडात रक्कम जमा केली पाहिजे. महाराष्ट्रात अनेक नेते आहेत. काहीजण फ्लॅक्सवर पैसे खर्च करतात, लग्न, वाढदिवस, पार्ट्या साजरे करणारे अनेक श्रीमंत आहेत. त्यांनी राज्याला साधाल हाताने कोरोना काळात मदत करणे गरजेचे आहे. तरच महाराष्ट्रात सर्व आरोग्य यंत्रणा सुरळीत होईल. सध्या कोरोनाचे रुग्ण मल्टीपल पद्धतीने वाढत आहेत. अशा वेळी रुग्णांची काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या सरकारी दाव्खाने सुरु आहेत, परंतु खासगी डॉक्टर्स कुठे गेलेत देव जाणे ! राज्य सरकारने एक सूचना त्यांच्यासाठी काढून त्यांना कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी बाध्य करावे. इतर वेळी हे डॉक्टर्स गरिबांना महागडी औषधे देऊन, जास्त फी घेऊन लुबाडत असतात, अशा डोक्तार्सनी कोरोनाकाळात जनतेकडे पाठ फिरवणे म्हणजे वैद्यकीय व्यवसायाशी केलेली प्रतारणा आहे. राज्य सरकारने खासगी डॉक्टर्सना नोटीस पाठवून कोरोनाच्या लढ्यात सामील करून घ्यावे. कोरोना काळात काही ठराविक खासगी दवाखाने रुग्णांसाठी सेवेत आहेत, परंतु बहुतांश डॉक्टर्स आम्हाला कोरोना आणि रुग्णांशी काहीच घेणेदेणे नाही, असा गंभीर व अमानवीय प्रकार सुरु आहे. कोरोनाचे वैशिष्ठ्य म्हणजे कोरोनाची लक्षणे पॉझिटिव्ह रुग्णात दिसत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर वेळेवर चाचणी केली जात नाही. नंतर जेव्हा कोरोनाचा जास्त प्रभाव होऊ लागतो, त्यावेळी रुग्णाला रुग्णालयात दाखल केले जाते. सध्या विशेष म्हणजे देशात किंवा महाराष्ट्रात 0. २५ टक्के लोकांच्या कोरोनाच्या चाचण्या झाल्या आहेत. या चाचण्यांची संख्या जेव्हा वाढेल, त्यावेळी, अनेक रुग्ण समोर येतील. त्यांच्याच्वर लवकर उपचार होतील. पण तसे होत नाही. त्यामुळेही कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण वाढत असण्याची शक्यता आहे. बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तीना प्रत्येक गावाने 14 दिवस दूर ठेवावे आणि त्यांची तपासणी करावी. बर्याच ठिकाणी या गोष्टी दुर्दैवाने पाळ्या जात नाहीत. तसेच सध्या सोशल अंतर ठेवण्यापेक्षा शारीरिक अंतर ठेवणे महत्वाचेआहे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा नेहमी वापर करणे, गर्दीत न जाणे, सर्दी-खोकला-ताप अशी लक्षणे आढळल्यास तपासणी करून घेणे या गोष्टी नागरिक करीत नाहीत. नागरिकांनीही सतर्कता बाळगणे महत्वाचे आहे.


